आम्ही वारकरी

sgm

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदायबद्दल

वारकरी संप्रदायबद्दल

CEO & Founders

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

श्री संत गणेशनाथ महाराजांबद्दल

श्री संत गणेशनाथ महाराजांबद्दल

संत गणेशनाथ महाराज हे सोळाव्या शतकातील शिवकालीन संत. संत हे संत असतात तुमचे किंवा आमचे असे काही नसतात ते या मानवी कल्पनांच्या पुढे गेलेले असतात. जे विचार संत कबीरांच्या दोह्यामध्ये दिसतात तेच विचार संत तुकोबांच्या गाथ्यामध्ये आहेत आणि तेच विचार मी गणेशनाथ महाराजांच्या अभंगांमध्ये पाहिले म्हणून कोठे तरी वाटले की माझ्या गुरूंच्या विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे जेणेकरून समाजाचे कल्याण होईल आणि आपण आपल्या अंतरात्म्याला पाहू शकू. संत गणेशनाथ महाराजांचे चरित्र संत चरित्रकार महिपतीच्या “भक्तिविजय” या ग्रंथात लिहीले आहे आणि त्यात सांगितल्याप्रमाणे संत गणेशनाथ महाराज हे वैराग्यसंपन्न व्यक्तीमत्व होते आणि त्याची साक्ष जेंव्हा गणेशनाथ महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राजमहाली घेऊन गेले तेंव्हा आपणास राजविलासाची गोडी लागून विठ्ठलाचा विसर पडू नये म्हणुन ते सोबत काही खडे घेऊन जातात आणि त्यावर झोपतात हे जेंव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांच्या मनात संतांप्रती श्रध्दा आधिक दृढ झाली. संत गणेशनाथ महाराजांच्या मनात सर्व संत साधू पुरूषांबद्दल खुप आदर होता आणि त्यांना आदर्श मानुन स्वत: तसे जिवन जगले. सद्गुरू मल्लारीनाथ हे त्यांचे गुरू होते तर पुढे त्यांचा वारसा संत प्रेमनाथ महाराजानी चालवला. सारसा आणि उजनी या गावात त्यांचे वास्तव्य होते आणि या दोन्ही गावात त्यांची समाधी आहे तसेच कार्तिक पौर्णिमेला यात्रा महोत्सव होतो.

John

About this Website

*“एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।’*

वारीची चर्चा करताना पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे – वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेला परमार्थ हा सामूहिक आहे. जप, तप, ध्यान, धारणा या साधना वैयक्तिक आहेत. वारी ही गोष्ट अनेकांनी मिळून करायची आहे. “एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ असा हा मामला आहे. म्हणून तर तुकाराम महाराज स्वल्प वाटे चला जाऊ। वाचे गाऊ विठ्ठल।। तुम्ही आम्ही खेळमेळी। गदारोळी आनंदे।।’ असे आवाहन सर्वांनाच करतात. या आवाहनातील “खेळीमेळी, “गदारोळी’, “आनंदे’ हे शब्द लक्षणीय आहेत. वैयक्तिक पद्धतीने साधना करणारे साधक असे शब्दप्रयोग करू शकत नाहीत. पूर्वीच्या विचारांनुसार मोक्ष किंवा मुक्ती, म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटून परत या लोकांत न येणे हेच मानवी जीवनाचे ध्येय किंवा इतिकर्तव्यता होती. परम पुरुषार्थ होता या उलट इहलोकात परमात्मसुख भोगण्यासाठी वारंवार जन्म घ्यावा. या सुखापुढे जन्म-मरणाचे दुःख काहीच नाही. सृष्टी अज्ञानाची किंवा अविद्येतून निर्माण झालेली नसून, परमेश्‍वराच्या इच्छेतूनच निर्माण झाली आहे. ती परमेश्‍वराचेच स्फुरण किंवा स्फूर्ती आहे. ती माणसाला हवी असो अथवा नसो, परमेश्‍वरालाच हवी आहे. याचाच अर्थ ती नाकारणे म्हणजे परमेश्‍वराच्या इच्छेविरुद्ध जाणे.वारकऱ्यांच्या प्रत्येक कीर्तनाचा व भजनाचा समारोप ज्या मागण्याच्या अभंगाने होतो, तो सर्व प्रसिद्ध आहे-
“हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा । गुण गाईन आवडी । हीच माझी सर्व जोडी । न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा । तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।’